प्रतिनिधी : सुरेश शिंदे
लोणावळा : शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्थानका रेल्वे जवळ रेल्वे खाली आल्याने गंभीर दुखापत होऊन प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी मयत झाला आहे.
सदर मयताचे वर्णन पुढील प्रमाणे
उंची साधारण पाच फूट पाच इंच, असून शरीराचा बांधा मजबूत ,रंग गोरा , नाक बसके व मध्यम ओठ ,डोळे मध्यम, कान मध्यम असून वय अंदाजे 35 ते 37 दरम्यान आहे.
डोक्याचे केस काळे व मध्यम वाढलेले तसेच मिशी बारीक व काळी दाढी नाही मयताच्या अंगावर अबोली रंगाचा टि शर्ट पांढरे बनियन असून डंगरी बरमुडा पॅन्ट राखाडी रंगाची अंडर पॅन्ट आहे .
तरी सदर वर्णनाचा व्यक्ती बाबत काही माहिती मिळाल्यास व कोणत्या पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल असेल तर पोलीस हवालदार ठाकरे मोबाईल नंबर 7218574797 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.