दिनांक – ३ सप्टेंबर
प्रतिनिधी – सुरेश शिंदे ,
तळेगाव दाभाडे – नामशेष होणारे गिधाड प्रजाती याच्या जनजागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय गिधाड दिनानिमित्त आज वन्यजीव रक्षक मावळ संस्था पुणे वनविभाग पुणे शिरवता विभाग मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करण्यात आली…..
अनेक वर्षांपूर्वी गिधाड स्वच्छता दूत म्हणून ओळखला जात होता अनेक भागात मृत जनावरे किंवा इतर काही जंगली जनावरे मरून पडली तर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम गिधाडाची प्रजाती ही करत होती त्यामुळे पर्यावरण संतुलित राहत होते मात्र काही वर्षात मात्र त्यांची संख्या ही खूपच कमी झालेली आढळत आहे.
अशीच संख्या कमी झाली तर येणाऱ्या भावी पिढीला नक्की गिधाड म्हणजे काय हे दाखवण्यासाठी मोबाईलचा वापर करून गुगलवर सर्च करून त्याची माहिती घ्यावी लागेल अशी भीती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक सभासद गणेश निसाळ व गणेश ढोरे यांनी व्यक्त केली
आज आंतरराष्ट्रीय गिधाड दिनाचे निमित्त निमित्ताने वनाधिकारी तसेच वन्यजीव रक्षक व संस्था सभासद गणेश निसाळ, गणेश ढोरे, जिगर सोलंकी, निनाद काकडे, सत्यम सावंत व इतर सभासदांनी मावळातील काही डोंगराळ भागात जाऊन गिधाडांची पाहणी केली तसेच त्यांचे नक्की राहणीमान कसे आहे याविषयी देखील सखोल माहिती घेऊन “गिधाड वाचवा ” या मोहिमेसाठी जनजागृती केली. आज आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिनानिमित्त वनपरिक्षेत्र – शिरोता अंतर्गत वनपरिमंडळ- वाहाणगाव मधील नियतक्षेत्र- कल्हाट मधील मौजे.कल्हाट येथे वनविभाग शिरोता व तळेगाव दाभाडे यांचे संयुक्तं विद्यमाने आणि मा.मुख्यवनसंरक्षक श्री एन. आर. प्रविण सो. व मा. उपवनसंरक्षक पुणे श्री राहुल पाटील सो. यांच्या मार्गदर्शनात व मा.सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे सो.व वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता श्री सुशिल मंतावर यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी गिधाडं चे पर्यावरणातील महत्व व गिधाड संवर्धन बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी वनपरिमंडळ अधिकारी वहानगाव- एस.एस.बुचडे व वनरक्षक पिंपरी- के.एस.पाटील, वनरक्षक खांडी-एस. एच. तांबे, वनरक्षक किवळे- एन. आर. मिलखे, वनरक्षक वाघापुरे व वनमजुर अनंता हेमाडे ,व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.