दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास शिताफीने केले गजाआड….
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ६१२/२०२३ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे दिनांक ०४/१२/२०२३ रोजी दाखल असुन सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेले वाहनाचे शोधात असतांना तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस शिपाई/३०३४ हर्षद कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयात चोरीस गेलेले वाहन श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभे आहे.अशी माहीती मिळताच तपास पथक प्रमुख पोउपनि रविंद्र खामगळ व पोहवा कोकतरे हे तात्काळ सदर ठिकाणी जावुन तेथे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाबाबत आजुबाजुस चौकशी केली असता, सदर वाहन हे इसम नामे उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे याने तेथे उभे केलेले असल्याबाबत समजले.
त्यावरून लागलीच नमुद इसमाबाबत माहीती काढुन त्यास मारूती मंदीर चौक येथुन ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देवुन तळेगाव दाभाडे गावचे हद्दीतुन इतरही दुचाकी वाहने चोरल्याचे व ती वाहने त्याचा साथीदार नामे लालु सखाराम मेंगाळ रा. कॉलनी वाडी इंदोरे, ता. इगतपुरी याचे मदतीने नाशिक जिल्हयातील इगतपुरी व पालघर जिल्हयातील मोखाडा या भागात विकी केली असल्याचे सांगितले. त्यावरून पोस्टे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासुन व आरोपीने दिलेल्या कबुलीप्रमाणे खात्री करून नमुद आरोपीने तळेगाव दाभाडे गाव व परिसरातुन चोरलेले दुचाकी वाहनांचे जप्ती कामी मा. वरिष्ठांचे परवानगीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी पोउपनि खामगळ व अंमलदार यांनी नमुद दोन्ही ठिकाणी जावुन इगतपुरी येथुन १०, मोखाडा येथुन ०४ तसेच तळेगाव दाभाडे गावचे हद्दीतुन ०५ याप्रमाणे एकुण १९ दुचाकी वाहने (सर्व दुचाकी वाहनांची जु. वा. किं. अं. ४,७५,०००/-रूपये) येणे प्रमाणे मुद्देमाल आरोपी नामे उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे वय ४० वर्षे रा. तळेगाव दाभाडे याने सांगितलेल्या ठिकाणांवरून जप्त करण्यात आलेला असुन नमुद सर्व वाहन चोरीचे गुन्हयांचा तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी साो, मा. पोलीस उपायुक्त परि.०२ श्री. बापु बांगर साो. मा. सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. देवीदास घेवारे साो. तळेगाव दाभाडे पोस्टे वपोनि श्री. किशोर पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोउपनि रविंद्र खामगळ, स. फौ.कदम, पोहवा कोकतरे, पोशि कदम, सगर, ओव्हाळ, मोहीते, झेंडे, मदने यांनी केलेली आहे.